सकाळी उपाशीपोटी चिया सीड्स खाण्याचे 3 प्रकार, वजनही होईल कमी

Published : Apr 18, 2025, 11:05 AM IST

Chia Seeds Benefits : सध्याच्या काळात हेल्दी राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी काहीजण जिम, योगा किंवा वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. तरीही वजन कमी होत नाही. 

PREV
15
चिया सीड्सचे फायदे

वजन कमी करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या एक्सरसाइज ते डाएट प्लॅन फॉलो करतात. तरीही वजन कमी होत नाही. अशातच चिया सीड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खासकरुन उपाशीपोटी चिया सीड्सचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. याशिवाय दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

25
चिया सीड्समधील पोषण तत्त्वे

चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे वजन कमी होण्यासह पोट स्वच्छ राहणे, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. पण काहीजण खूपवेळ चिया सीड्स भिजवून ठेवतात. मात्र चिया सीड्स कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारे सेवन करावे हे जाणून घेऊया.

35
चिया डिटॉक्स वॉटर

रात्रभरत एका ग्लासमध्ये 1 चमचा चिया सीड्स भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिक्स करुन पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.

45
चिया पुदीना ड्रिंक

चिया सीड्स 15-20 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून त्यामध्ये ताजी पुदीन्याची पाने, एक चिमूटभर काळ मीठ आणि अर्धा लिंबू मिक्स करा. सकाळी उपाशी पोटी हे ड्रिंक पोटाला थंडावा देण्यास मदत होते. ब्लोटिंगची समस्याही दूर होते. याशिवाय पचनक्रिया सुधारली जाते.

55
चिया योगर्ट बाउल

पौष्टिक नाश्तामध्ये एका बाउलमध्ये दह्यामध्ये 1 चमचा चिया सीड्स मिक्स करा. यामध्ये कापलेली ताजी फळं आणि थोडे नट्स घाला. यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि वजन देखील कमी होते.

Recommended Stories