15
साहित्य :
बर्गर बन – 2 भाजलेले आलू टिक्की / कटलेट – 2 कापलेली कांदा व टोमॅटोच्या चकत्या – 2-2 लेट्यूस पाने (Lettuce leaves) – काही चीज स्लाइस – 2 मेयोनीज – 2 चमचे टोमॅटो सॉस – 2 चमचे मोहरी सॉस (ऑप्शनल) – 1 चमचा लोणच्याचे काकडीचे तुकडे (Pickles) बटर – 2 चमचे चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर Subscribe to get breaking news alertsSubscribe 25
आलू टिक्की/कटलेट तयार करा :
2-3 उकडलेले बटाटे मॅश करा. मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, थोडी हळद, गरम मसाला, आणि थोडे कॉर्नफ्लोअर घाला. व्यवस्थितीत मिक्स करून गोल टिक्कीसारखा आकार द्या. तव्यावर थोड्या तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. 35
बन्स तयार करा :
बर्गर बन्स मधून मधोमध कापा. दोन्ही भागांवर थोडे बटर लावा. गरम तव्यावर बन्स थोडे कुरकुरीत होईपर्यंत परता. 45
बर्गर सेट करा :
बन्सच्या खालच्या भागावर आधी मेयोनीज लावा. मग एक लेट्यूस पान ठेवा. त्यावर आलू टिक्की ठेवा. मग त्यावर चीज स्लाइस ठेवा. कांदा व टोमॅटोचे काप व्यवस्थित लावा. थोडासा टोमॅटो सॉस व मोहरी सॉस पसरवा. हवे असल्यास काही लोणच्याचे तुकडे ठेवा. शेवटी वरचा बन लावून बर्गर बंद करा. 55
सर्व्ह करा :
तयार झालेला बर्गर गरम गरम सर्व्ह करा. सोबत थोडे फ्रेंच फ्राइज किंवा कोल्ड ड्रिंक दिल्यास परफेक्ट कॉम्बो होतो!