हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. आजपासून चैत्र नवरात्रीच्या सणाला सुरूवात झाली असून 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. जाणून घेऊया देवीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबद्दल सविस्तर...
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला आजपासून (9 एप्रिल) सुरूवात झाली आहे. चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. याशिवाय आजपासून हिंदू नववर्ष (Hindu New Year) आणि गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सणही साजरा केला जात आहे.
चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होते. घटस्थापनेचा मुहूर्त आज सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून सुरू झाला आहे. तो सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करता न आल्यास तुम्ही अभिजीत मुहूर्तावरही घटनस्थापना करू शकता. अभिजीत मुहूर्त आज सकाळी 11 वाजून 57 मिनिटांपासून सुरू होणार असून दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत असणार आहे.
चैत्र नवरात्री पूजा विधी
आज देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे. यामुळे सर्वप्रथम देवघरात कलशाची स्थापना करा.
गणपतीची पूजा करून अखंड ज्योत पेटवा.
देवी शैलीपुत्रीचा आवडा रंग पांढरा आहे. याशिवाय नारंगी आणि लाल रंगाचा वापर करून पूजा करू शकता.
आता षोडोपचार पद्धतीने देवी शैलीपुत्रीची पूजा करा. यावेळी देवी शैलीपुत्रीला कुंकू, पांढऱ्या रंगातील चंदन, पान, हळद, अक्षता, सुपारी, नारळ आणि 16 श्रृंगार अर्पण करा.
देवीला पांढऱ्या रंगातील फूल, मिठाईचा भोग दाखवा.
पूजा आणि भोग दाखवल्यानंतर देवी शैलीपुत्रीच्या बीज मंत्राचा जाप करत आरती करा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.