काजू आणि शेंगदाणे.. हे दोन्ही आपण नियमित खातो. पण यापैकी आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे? काजूमध्ये जास्त पोषक तत्त्वे असतात की शेंगदाणे खाल्ल्याने जास्त प्रोटीन मिळते? कोणती गोष्ट कोणी खावी?
काजू आणि शेंगदाणे यापैकी कशात जास्त पोषक तत्त्वे असतात?
ड्रायफ्रुट्स आणि नट्स आरोग्यासाठी चांगले असतात, हे आपल्याला माहीत आहे. विशेषतः काजू आणि शेंगदाणे बरेच जण नियमित खातात. काहींना काजू खायला आवडतात, तर काही जण शेंगदाणे स्नॅक म्हणून खातात. या दोन्हीमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. पण जास्त आरोग्यदायी काय आहे? कशात प्रोटीन जास्त असते? हृदयासाठी काय चांगले आहे?
25
काजूमधील पोषक तत्त्वे
काजूमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबरसोबतच अनेक विटामिन्स आणि मिनरल्स असतात. विशेषतः मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, लोह आणि फॉस्फरस हे घटक काजूमधून मिळतात. शरीराच्या विविध क्रिया सुरळीत चालण्यासाठी हे उपयुक्त ठरतात. काजूमधील मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेचे कार्य तसेच हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
35
शेंगदाण्यांमधील पोषक तत्त्वे
शेंगदाणे बरेच जण स्नॅक म्हणून खातात. यातही उत्तम पोषक तत्त्वे असतात. प्लांट-बेस्ड प्रोटीनसाठी शेंगदाणे हा एक उत्तम स्रोत आहे. स्नायूंची निर्मिती आणि उती दुरुस्त करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनसोबत हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर, विटामिन ई, नियासिन, फोलेट, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. शेंगदाण्यातील नियासिन पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी मदत करते.
साधारणपणे १०० ग्रॅम काजूमध्ये सुमारे ५५३ कॅलरीज, १८ ग्रॅम प्रोटीन, ४४ ग्रॅम फॅट आणि ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. तर १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे ५६७ कॅलरीज, २६ ग्रॅम प्रोटीन, ४९ ग्रॅम फॅट आणि १६ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.
हृदयासाठी काय चांगले आहे?
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर हे दोन्ही मोजक्या प्रमाणात आहारात समाविष्ट करू शकता. काजू आणि शेंगदाण्यांमधील अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण जास्त मीठ, मसाले असलेले शेंगदाणे किंवा तेलात तळलेले काजू सतत खाणे योग्य नाही.
55
वजन कमी करायचे असल्यास काय खावे?
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शेंगदाणे आणि काजू दोन्ही फायदेशीर ठरतात. पण यात कॅलरीज जास्त असल्याने प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. काजूमधूनही हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन मिळते. त्यामुळे जे काही खाल, ते मर्यादित प्रमाणात खा.
किती प्रमाणात खावे?
काजू आणि शेंगदाणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी अतिप्रमाणात खाऊ नये. काजू ४ ते ६ आणि शेंगदाणे मूठभर खाऊ शकता. वय, शारीरिक हालचाल आणि दररोजच्या कॅलरीजच्या गरजेनुसार हे प्रमाण थोडेफार बदलू शकते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.