चाणक्य नीती: ऑफिस असो किंवा समाज, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही. आचार्य चाणक्यांच्या या 6 नीती अवलंबल्यास तुम्हाला यशस्वी जीवन जगता येईल. या नीती कोणत्या आहेत?
Chanakya Niti: यशस्वी जीवनासाठी चाणक्यांचे ६ मंत्र
आचार्य चाणक्यांचे विचार आजही खूप मार्गदर्शक आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत खोल अर्थ दडलेला आहे. जीवनात मूल्य, आदर आणि प्रतिष्ठा केवळ बोलून मिळत नाही, तर ती आपल्या वागणुकीतून कमवावी लागते. तुम्ही कसे आहात, तुमची प्रामाणिकता काय, तुमचं महत्त्व काय हे नेहमी इतरांना सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. चाणक्यांचे हे सात नियम समजून घेतले आणि अमलात आणले तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आदर मिळेल आणि लोक तुमची व्हॅल्यू ओळखतील.
26
स्वतःला वारंवार सिद्ध करू नका
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कामाच्या ठिकाणी आदर आणि ओळख मिळवायची असते. फक्त ऑफिसमध्येच नाही, तर ऑफिसच्या बाहेर समाजातही आपली एक चांगली ओळख असावी, आपल्या चांगुलपणाची, कामाच्या दर्जाची आणि मूल्यांची दखल घेतली जावी, असं सगळ्यांनाच वाटतं.
पण हे वारंवार सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. काही लोक फक्त देखावा करतात. सोशल मीडियाच्या काळात मदतीचे व्हिडिओ बनवणे, चांगुलपणाचं नाटक करणे हे प्रकार वाढले आहेत. पण जर तुम्ही खरोखरच चांगले आणि आदरास पात्र असाल, तर ते सिद्ध करत बसण्याची गरज नाही, असं आचार्य चाणक्य सांगतात.
36
चाणक्यांच्या मते या ६ प्रसंगी गप्प राहा
प्रत्येक गोष्टीवर रिअॅक्ट होऊ नका
प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा. योग्य वेळ आल्यावरच उत्तर द्या. गरजेच्या वेळीच बोलल्यामुळे तुमचा प्रभाव वाढतो.
ज्ञानाचं प्रदर्शन नको
तुम्ही कितीही हुशार असाल किंवा तुमच्यात कितीही कौशल्यं असली, तरी त्याचा उगाच दिखावा करू नका. योग्य वेळी तुमच्या कामातून तुमची क्षमता सिद्ध करा. तुमचं ज्ञान इतरांना दाखवण्यापेक्षा रिझल्ट्स बोलू द्या.
मोठे म्हणतात ना, आदर द्या आणि आदर घ्या (Give respect and take respect), आचार्य चाणक्यही हेच सांगतात. जो व्यक्ती इतरांचा सन्मान करतो, त्याला समाजात आणि कामाच्या ठिकाणी आपोआपच सन्मान मिळतो.
प्रामाणिक राहा
वेळेचं भान, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वास जिंकू शकता. शिस्तीने वागलात, काम वेळेवर पूर्ण केलंत आणि प्रामाणिक राहिलात तर आदर तुमच्याकडे चालून येतो.
56
ऑफिस पॉलिटिक्सपासून चार हात लांब
सर्वात आधी ऑफिसचं वातावरण समजून घ्या. विनाकारण वाद, गटबाजी आणि राजकारण यापासून लांब राहा. प्रत्येक ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतंच, पण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. या गटबाजीपासून दूर राहणे म्हणजे सगळ्यांपासून फटकून राहणे असा होत नाही; सगळ्यांना समान वागणूक द्या. आदर कधीच मागून मिळत नाही, तो इतरांना दिल्यामुळेच मिळतो.
फक्त स्वत:च बोलत राहू नका, तर इतरांचं म्हणणंही शांतपणे ऐकून घेण्याची सवय लावून घ्या. इतरांचे विचार लक्ष देऊन ऐकल्याने नातेसंबंध सुधारतात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळतो.
66
इतरांच्या प्रयत्नांचा आदर करा
तुमच्या सहकाऱ्यांच्या कामाचं कौतुक करा, त्यांना मान द्या. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये म्हटलंय, 'जो माणूस इतरांच्या प्रयत्नांचा आणि कामाचा आदर करतो, तोच पुढे जाऊन मोठा नेता बनतो.' त्यामुळे ऑफिस असो वा समाज, चाणक्यांच्या या नियमांचं पालन केल्यास तुमचा आदर नक्कीच वाढेल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.