Methi Leaves Cleaning Tips : मेथीचा पराठा, मेथीची पुरी अथवा मेथीच्या भाजीचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. मेथीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात, ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही भाजी फायदेशीर आहे.
यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. खरंतर मेथी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पण ही भाजी निवडण्यासाठी बराच वेळ लागतो. पण मेथी निवडण्याची सोपी पद्धत तुम्हाला कळली तर? जाणून घेऊया याबाबतच सविस्तर माहिती…
25
VIDEO : मेथीची पाने निवडण्याची सोपी ट्रिक
मास्टरशेफ पंकज भदौरिया (Masterchef Pankaj Bhadouria) यांनी नुकत्याच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पंकज यांनी पुरी तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाऱ्याच्या मदतीने मेथीची भाजी निवडण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे. झारा एका हातात पकडावा व त्यावरील छिंद्रामध्ये मेथीच्या भाजीचे देठ घालावे व खालील बाजूने देठ खेचावे. ही पद्धत वापरल्यास अगदी कमी वेळामध्ये मेथीची भाजी निवडून होईल. (Methichi Bhaji Swacha Kashi Karychi Tips)
35
व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर मास्टरशेफ पंकज यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 15 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. पंकज यांनी मेथी निवडण्याची दाखवलेली ही ट्रिक अतिशय उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया युजर्संनी दिली आहे.