Ayodhya Ram Temple Opening : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 22 जानेवारी 2024 याच दिवसासाठी का निवड करण्यात आली?
अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Temple Opening) आणि रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी याच तारखेची निवड का करण्यात आली आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती…
उज्जैनमधील ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2024 या दिवशी सूर्यादय द्विपुष्कर योगमध्ये आहे, हा योग सकाळी 7 वाजून 13 मिनिटांपर्यंत आहे. या योगमध्ये केलेल्या शुभ कार्यांचे दुप्पट फळ मिळते.
22 जानेवारी 2024 रोजी अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धी असे दोन योग दिवसभर असणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, हे दोन्ही योग अतिशय शुभ आहेत. या योगांमध्ये केलेले कार्य यश मिळवून देते, असे म्हणतात.
पंचांगानुसार 22 जानेवारी 2024 रोजी मृगशिरा नक्षत्र असल्याने आनंद नावाचे शुभ योग दिवसभर असेल. तसेच या दिवशी ब्रह्म आणि इंद्र नावाचेही शुभ योग असणार आहेत.
22 जानेवारी 2024 रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथि आहे. या तिथिचे स्वामी भगवान विष्णू आहेत. श्री राम हे भगवान विष्णू यांचाच अवतार आहेत. यामुळे देखील हा दिवस खास असल्याचे म्हटले जात आहे.
22 जानेवारी 2024 रोजी कूर्म द्वादशीनिमित्त व्रत केले जाईल. हा व्रत भगवान विष्णू यांच्या कच्छप अवताराशी संबंधित आहे. या अवतारात भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण केले होते, अस म्हणतात.
पुढील वर्षी 22 जानेवारी रोजी सोम प्रदोष व्रत देखील केले जाईल. सोमवारी प्रदोष तिथिचा योग असणे ही बाब फार दुर्मिळ आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्ष 2024 मधील हा पहिलाच सोम प्रदोष असेल. यासाठीही हा दिवस खूप खास आहे.
22 जानेवारी रोजी चंद्र आपली उच्च रास वृषभमध्ये असेल. सूर्य मकर राशीमध्ये, शनि स्वराशी कुंभमध्ये, गुरू आपला मित्र मंगळाची रास मेषमध्ये असणार आहे. ग्रहांची ही स्थिती शुभ फळ देणार आहे.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक
Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?
AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.