Matar Recipe : तुमची मुले पौष्टिक पदार्थ खाणे टाळतात? मग जाणून घ्या मटारच्या या खमंग रेसिपी
Green Peas Recipes : मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा योग्य पद्धतीने विकास व्हावा, यासाठी त्यांच्या आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे.
Harshada Shirsekar | Published : Dec 21, 2023 3:13 PM IST / Updated: Dec 21 2023, 08:49 PM IST
मटार पोहे
पोह्यांच्या पारंपरिक रेसिपीचा कंटाळा आला असेल तर आपल्या मुलांना मटार पोह्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. पोहे, मटार, कांदा, टोमॅटो या सामग्रीचा वापर करून स्वादिष्ट पोहे तयार करा.
मटार पुलाव
मटार पुलावचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हो ना? बारीक चिरलेले गाजर आणि मटार मिक्स करून घराच्या घरी आपल्या मुलांसाठी खमंग मटार पुलावची रेसिपी नक्की तयार करा.
मटार चाट
उकडलेल्या मटारमध्ये उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरून घरच्या घरी मटार चाट तयार करा. त्यावर लिंबाचा रस देखील सोडावा. ही रेसिपी तुमच्या मुलांना नक्की आवडेल.
मटार पराठे
मटारचे पराठे तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील. मटार हलकेसे उकडून घ्या व मिक्सरमध्ये जाडसर वाटा. यामध्ये आपल्या आवडीचे मसाले मिक्स करा आणि पराठ्याचे मिश्रण तयार करा. यानंतर पराठे लाटून आपल्या मुलांसाठी गरमागरम पराठे दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
मटार कचोरी
मटार कचोरी हा पदार्थ म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण. फ्लावर, मटारचा वापर करून कचोरीचे मिश्रण तयार करून घ्या. यानंतर मंद आचेवर कचोरी तळून घ्या. पुदिना चटणीसोबत गरमागरम कचोरी आपल्या मुलांना खाण्यासाठी सर्व्ह करावी.
मटार सूप
हिवाळा ऋतुमध्ये मटारचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. आरोग्यास पोषणतत्त्वांचा पुरवठा व्हावा, याकरिता आपण उकडलेले मटार मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेल्या मटारपासून स्वादिष्ट सूप तयार करून आपल्या मुलांना प्यायल्या द्यावे.
मेथी मटार मलाई
तुमच्या मुलांना मेथी मटार मलाई ही डिश देखील नक्की आवडेल. पण यामध्ये वापरली जाणारी मलाई घरातच तयार केलेली वापरावी. यामुळे मुलांच्या आरोग्यास पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.