हातावरील मेंदीमुळे काहीजणांना अॅलर्जी होणे सामान्य बाब आबे. पण कधीकधी त्वचा जळजळ करणे किंवा खाज येण्याची समस्या उद्भवत असल्यास काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Tips for Mehndi : लग्नसोहळा किंवा एखादे फंक्शन महिला आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेंदी लावतात. खरंतर, हिंदू धर्मात हातावर मेंदी काढणे शुभ मानले जाते. पण काही महिलांना हातावर मेंदी काढल्यानंतर अॅलर्जी, त्वचा जळजळ करणे किंवा खाज येण्याच्या समस्यांचा सामना करतात. अशातच मेंदीमुळे अॅलर्जी झाल्यास काय करावे याबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया...
हातांवर मेंदी काढण्यापूर्वी ती पूर्णपणे नैसर्गिक हिना मेंदी असावी. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नसावा. याशिवाय मार्केटमध्ये मिळणारी काळ्या रंगातील किंवा अत्याधिक वास येणाऱ्या मेंदीपासून दूर रहा. यामध्ये पॅराफेनिलनेडियम केमिकल असू शकते. या केमिकलमुळे त्वचेवर जळजळ, खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
मेंदीचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. हातावर एक बाजूला किंवा कानाच्या मागे मेंदीने पॅच टेस्ट करू शकता. यानंतर त्वचेला सूज, जळजळ किंवा लाल झाल्यास अशा मेंदीचा वापर करणे टाळा.
मेंदी पूर्णपणे सुकल्यानंतर ती नारळाचे किंवा राईचे तेल लावून काढा. हातावर जळजळ किंवा खाज येत असल्यास मॉइश्चराइजरचा वापर करा. अथवा एक्सपर्टचा सल्ला घ्या.
त्वचेवर जखम, लाल चट्टे असल्यास मेंदी काढणे टाळा. यामुळे त्वचेवर अधिक जळजळ होऊ शकते. जखमेवर मेंदी लावल्याने तुमचेच नुकसान होईल हे लक्षात ठेवा. यामुळे मेंदी लावण्यापूर्वी नेहमीच त्वचा स्वच्छ आणि हेल्दी असावी.
मेंदी ताजी राहण्यासाठी फ्रिजमध्ये स्टोर करू शकता. आठवडाभर किंवा महिन्याभरापूर्वी घेतलेल्या मेंदीचा वापर करू नका. यामुळे त्वचेवर लाल चट्टे, जळजळ किंवा अॅलर्जी होण्याची दाट शक्यता असते.
आणखी वाचा :