केसांवर हेयर मास्क लावण्याआधी या 5 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा वाढेल समस्या
Hair Care Tips : केसांवर हेयर मास्क लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा केसांचे नुकसान होण्यासह नैसर्गिक चमकही निघून जाऊ शकते. जाणून घेऊया हेयर मास्क लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे सविस्तर….
केसांचे आरोग्य राखण्यासाठी महिला वेगवेगळ्या हेयर ट्रिटमें करतात. याशिवाय हेयर मास्कचा देखील वापर केला जातो. हेयर मास्कचा वापर केल्याने केसांसंबंधित समस्या कमी होण्यासह हेल्दीही राहतात. पण काही वेळेस असे होते की, हेयर मास्क लावूनही केसांसंबंधित समस्या कमी होत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. योग्य पद्धतीने हेयर मास्कचा वापर कसा करावा याबद्दलच्या काही खास टिप्स पुढे जाणून घेणार आहोत.
शॅम्पूने धुवा केस
हेयर मास्क लावण्याआधी केस माइल्ड शॅम्पूने धुवा. यामुळे केस स्वच्छ होण्यासह केसांवर जमा झालेली घाण आणि तेलही निघून जाण्यास मदत होईल. हेयर मास्क लावण्याआधी केस शॅम्पूने धुतल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
ओलसर केसांवर लावा हेयर मास्क
हेयर मास्क ओलसर केसांवर लावू शकता. यामुळे हेयर मास्कचा पूर्ण फायदा केसांना होतो. यावेळी केस अधिक ओलसर नसावेत ही बाब लक्षात ठेवा.
योग्य हेयर मास्कची निवड
केसांसाठी कोणता हेयर मास्क योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी एक्सपर्ट्सची मदत घ्यावी लागेल. याशिवाय केसांच्या गरजेनुसार हेयर मास्कचा वापर करावा. हेयर मास्क आठवड्यातून दोन दिवस वापरू शकता.
या गोष्टींचीही घ्या काळजी
केसांच्या आरोग्यासाठी तेल लावणे आवश्यक आहे.
तेल लावल्यानंतर केस व्यवस्थितीत धुवा.
केसांसाठी केमिकल फ्री शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.
केसांवर हिटींग टूल्सचा कमी वापर करा.
आठवड्यातून दोनदा हेयर पॅकचा वापर करा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)