सप्टेंबर 2024 मध्ये कधी असणार अखेरचे चंद्रग्रहण? जाणून घ्या तारखेसह सूतक वेळ

वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण ग्रहणाची वेळ आणि याचा प्रभाव पडणार का याबद्दल जाणून घेऊया...

 

Chanda Mandavkar | Published : Sep 2, 2024 10:29 AM IST / Updated: Sep 05 2024, 07:56 AM IST

16
चंद्रग्रहणासंबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे

वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात असणार आहे. या ग्रहणाबद्दल सर्वांना जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. अशातच काहीजण सातत्याने असे विचारत आहे की, ग्रहणाची वेळ काय असणार किंवा भारतात दिसणार का? याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

26
कधी असणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण?

ज्योतिषशास्रानुसार, वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर, बुधवारी असणार आहे. हे एक उपच्छाया ग्रहण असणार आहे. या दिवशी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला असणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. येत्या 18 सप्टेंबरचे चंद्रग्रहण काही प्रकारे महत्वाचे असणार आहे.

36
चंद्रग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण 18 सप्टेंबरच्या सकाळी 06 वाजून 11 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. या ग्रहणाचा कालावधी 04 तास 06 मिनिट असणार आहे. वेगवेगळ्या देशात याच्या वेळेत फरक असणार आहे.

46
भारतात चंद्रग्रहण दिसणार का?

वैज्ञानिकांनुसार, 18 सप्टेंबरला असणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण आर्कटिक युरोप, उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, हिंद महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्कटिका अशा काही ठिकाणी दिसणार आहे.

56
सूतक वेळ

विद्वानांनुसार, चंद्रग्रहणावेळी सूतक काळ याच्या सुरु होण्याच्या 9 तास आधी सुरु होते. म्हणजेच ज्या देशात चंद्रग्रहण असणार आहे तेथे 9 तास आधी सूतक काळ सुरु होणार आहे. दरम्यान, भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही. यामुळे सूतक काळही नसणार आहे.

66
उपच्छाया ग्रहण म्हणजे काय?

खलोग विज्ञानात चंद्रग्रहणाचे काही प्रकार सांगण्यात आले आहेत. यापैकीच एक म्हणजे उपच्छाया ग्रहण आहे. या ग्रहणावेळी पृथ्वीच्या बाहेरच्या हिस्साची छाया चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा पृष्ठभाग हलका भुरकट दिसू लागतो. यालाच उपच्छाया चंद्रग्रहण असे म्हटले जाते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : मध्यप्रदेशातील गणपती मंदिरात उलटा स्वस्तिक, वाचा कारण

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

Share this Photo Gallery
Recommended Photos