चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी तयार करा हे 5 Home made Scrub

Published : Apr 15, 2025, 02:08 PM IST

Home made scrub for glowing face : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबिंग महत्त्वाचं आहे. बाजारातील स्क्रबमध्ये केमिकल्स असू शकतात, पण घरच्या घरी तयार केलेले स्क्रब नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक असतात.

PREV
16
साखर आणि मधाचा स्क्रब

साहित्य:

  • 1 चमचा साखर
  • 1 चमचा मध
     

कसे तयार करावे: 
साखर आणि मध एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा शरीरावर लावून 2-3 मिनिटं हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवा. 

उपयोग : त्वचा मृदू आणि हायड्रेटेड राहते.

26
कॉफी आणि खोबरेल तेल स्क्रब

साहित्य :

  • 2 चमचे कॉफी पावडर
  • 1 चमचा खोबरेल तेल

कसे तयार करावे: 
दोन्ही घटक चांगले मिक्स करून त्वचेवर मसाज करा. 5 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. 

उपयोग: मृत त्वचा दूर करते, त्वचा फ्रेश वाटते.

36
बेसन आणि हळद स्क्रब

 साहित्य :

  • 2 चमचे बेसन
  • 1 चिमूट हळद
  • थोडं दूध किंवा दही

कसे तयार करावे : 
सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून 5-10 मिनिटं वाळू द्या, नंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुवा. 

उपयोग : त्वचा उजळते आणि मुरुम कमी होतात.

46
ओट्स आणि दही स्क्रब

 साहित्य :

  • 1 चमचा बारीक ओट्स
  • 1 चमचा दही

कसे तयार करावे :
 दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावून सौम्य स्क्रब करा. नंतर थंड पाण्याने धुवा. 

उपयोग : कोरडी त्वचा सॉफ्ट होते, डेड स्किन निघते.

56
लिंबू आणि साखर स्क्रब

साहित्य:

  • 1 चमचा साखर
  • 1/2 लिंबाचा रस

कसे तयार करावे : 
साखर आणि लिंबू एकत्र करून कोपर, गुडघे किंवा टाचांवर स्क्रब करा. 

उपयोग : टॅनिंग दूर होते, त्वचा उजळते.

66
या गोष्टी ठेवा लक्षात
  •  स्क्रब करताना जास्त दाब देऊ नका.
  • आठवड्यातून 1-2 वेळा स्क्रब करणे पुरेसे आहे.
  • स्क्रब केल्यावर नेहमी मॉइश्चरायझर लावावा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories