Apple Cider Vinegar Benefits : अॅप्पल साइडर व्हिनेगरचा बहुतांशजण वापर करतात. याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. जाणून घेऊया दररोज सकाळी एक चमचा अॅप्पल साइडर व्हिनेगर पिण्याचे फायदे सविस्तर...
अॅप्पल साइडर व्हिनेगर म्हणजे सफरचंदाच्या रसापासून तयार केलेला एक प्रकारचा आंबट, नैसर्गिक व्हिनेगर. यामध्ये नैसर्गिक अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, आणि विविध पोषणद्रव्यं असतात. पारंपरिक औषधांपासून ते वजन कमी करण्यासाठी, त्वचेच्या समस्यांपर्यंत ॲपल सायडर व्हिनेगरचे विविध उपयोग आहेत.
26
वजन कमी करण्यात मदत
अॅप्पल साइडर व्हिनेगर पचन सुधारण्यास मदत करतं आणि भूक कमी करते. यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सहाय्य होतं.
कसा वापरावा: एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून सकाळी उपाशीपोटी घ्या.
36
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
अनेक अभ्यासानुसार, अॅप्पल साइडर व्हिनेगर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, विशेषतः जेवणानंतरची ब्लड शुगर.