या 5 फूड्सने करू नका दिवसाची सुरुवात, दिवसभर रहाल त्रस्त

Published : Dec 31, 2024, 11:21 AM IST
Morning Breakfast

सार

प्रत्येक फूड्सचे सेवन करण्याची एक योग्य पद्धत आणि वेळ असते. अशातच काही फूड्स सकाळी उपाशी पोटी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. याबद्दलच जाणून घेऊया...

5 foods to avoid to eat in breakfast : दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्ताने करावी असा सल्ला दिला जातो. यामुळे शरिराला संपूर्ण दिवस उर्जा मिळण्यासह हेल्दी राहण्यास मदत होते. खरंतर, सकाळी उपाशी पोटी तुम्ही सर्वप्रथम काय खाता हे फार महत्वाचे असते. शरिराला उर्जा मिळण्यासह उत्साही राहण्यासाठी वॉर्मअपसह हेल्दी डाएट महत्वाचे आहे. यामुळे सकाळच्या दिवसाची सुरुवात कोणत्या फूड्सने करू नये याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

केळ

केळ्यामध्ये पोषण तत्त्वे भरपुर प्रमाणात असतात. पण केळ कधीच उपाशी पोटी खाऊ नये. यामध्ये असणारे कार्बोहाइट्रेस, नैसर्गिक साखर शरिरातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते.

तळलेले पदार्थ

सकाळच्या नाश्तावेळी तळलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे सकाळच तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचनाची समस्या उद्भवू शकते. याशिवाय काम करताना सुस्तीही येऊ शकते.

आंबट फळं

उपाशी पोटी आंबट फळांचा ज्यूस किंवा फळांचे सेवन करू नये. यामुळे शरिरातील अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकते. अशातच बैचेन वाटणे किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. काही प्रकरणात यामुळे अल्सरचेही कारण ठरू शकते.

तिखट पदार्थ

सकाळच नाश्तावेळी तिखट पदार्थांचे सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते. याशिवाय उपाशी पोटी तिखट पदार्थांचे सेवन केल्याने अपचनाचीही समस्या उद्भवू शकते.

सॅलड

कच्च्या भाज्यांचे सॅलडने सकाळची सुरुवात करू नका. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पोटात दुखण्यासही समस्या उद्भवू शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

New year's eve साठी झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपी, वाढेल पार्टीचा उत्साह

हलवा नव्हे गाजरापासून तयार करा या 7 टेस्टी रेसिपी

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!