31 डिसेंबरच्या पार्टीवेळी रेस्टॉरंट स्टाइल पनीर टिक्का रेसिपी तयार करू शकता. यासाठी पनीर, दही, शिमला मिर्ची, लाल तिखट आणि मीठाचा वापर करुन ग्रील करावे लागेल.
बच्चेकंपनीसाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या पार्टीसाठी चॉकलेट कुकीज तयार करू शकता. यासोबत व्हाइट चॉकलेट सॉसही सर्व्ह करू शकता.
पार्टीसाठी स्टार्टर म्हणून स्टफ मशरुमची रेसिपी बेस्ट आहे. यासाठी मशरुम, मोझेरेला चीझ, चिली फ्लेक्स, ऑरिगानोचा वापर करुन रेसिपी तयार करू शकता.
संध्याकाळचा नाश्ता किंवा पार्टीसाठी टेस्टी आणि तिखट काहीतरी खायचे असल्यास समोसा, बटाटा वडा, ढोकळा किंवा मिरची भजी तयार करू शकता.
न्यू इअरच्या पूर्वसंध्येच्या पार्टीवेळी मिनी कप पिझ्जाची रेसिपी तयार करू शकता. यासाठी मोझेरेला चीझ, टोमॅटो. कांदा किंवा पसंतीच्या भाज्यांसह पिझ्जा सॉसचा वापर करू शकता.
सोयाचंक कटलेट्सही पार्टीतील पाहुण्यांच्या तोंडाची चव वाढवतील. यासाठी सोयाबिन भिजवून बारीक वाटून घ्या. यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ वापरा.
वेफर्स प्लॅटर पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे डीप किंवा सॉस ट्राय करू शकता.
पार्टीसाठी लसाग्ना विथ टोस्ट ब्रेडची रेसिपी तयार करू शकता. यासाठी चीझसह वेगवेगळ्या भाज्या आणि सॉसचा वापर करावा लागेल.
पार्टीसाठी झटपट तयार होणारी अशी चना कोलीवाडाची रेसिपी करू शकता. स्टार्टर म्हणून ही रेसिपी बेस्ट आहे.