थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा आवर्जुन तयार केला जातो. अशातच हलवा नव्हे पण गाजरापासून पुढील काही टेस्टी रेसिपी तयार करू शकता.
गाजराचा पराठा थंडीच्या दिवसात तयार करू शकता. यामध्ये आवडीच्या भाज्याही मिक्स करू शकता. लोणच किंवा दहीसोबत पराठा खाऊ शकता.
थंडीच्या दिवसात गाजराचे सूप पिऊ शकता. यामध्ये गाजरासोबत वेगवेगळ्या भाज्याही मिक्स करू शकता. गाजरामधील पोषण तत्त्वे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
गाजरापासून बर्फी तयार करू शकता. यासाठी गाजर बारीक किसून त्यामध्ये साखर, दूध, वेलची पावडर मिक्स करा.
गाजराची खीर देखील तोंडाची चव वाढवू शकते. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी गाजराची खीर तयार करू शकता.
गाजरापासून केक किंवा पेस्ट्री तयार करू शकता. नवं वर्षाच्या स्वागतावेळी आयोजन करण्यात आलेल्या पार्टीत गाजराचा केक पाहुण्यांना सर्व्ह करा.
गाजराचे लोणच्याचे थंडीत सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये मूळा, मिरचीही मिक्स करा.