चेहऱ्यावर ग्लो आणतील हे 4 ड्रिंक्स, सकाळी पिण्याचे वाचा फायदे

Published : Jan 29, 2025, 03:04 PM IST
10 budget friendly homemade weight loss drinks for Diwali 2024

सार

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा हेल्दी त्वचेसाठी योग्य डाएट फॉलो करणे फार महत्वाचे असते. अशातच सकाळच्या वेळेस अशा काही ड्रिंक्सचे सेवन करावे ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

4 Drinks for Face Glowing :  चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बहुतांशजण महागडे ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रिटमेंट करतात. पण ग्लोइंग त्वचेचे सीक्रेट आपल्या खाण्यापिण्यामध्येच दडले आहे. जर शरिरातील हार्मोन असंतुलित असतील तर तुम्ही तणावाखाली जाता अथवा शरिरात पोषण तत्त्वांची कमतरता किंवा योग्य स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यासही त्वचेवर ग्लो येत नाही. याशिवाय ज्या व्यक्तींचे पोट स्वच्छ नसते, जे अत्याधिक अनहेल्दी फूड्सचे सेवन करतात त्यांच्या चेहऱ्याचा ग्लो कमी होतो. अशातच सकाळच्या वेळेस कोणते ड्रिंक्स प्यावेत जेणेकरुन चेहऱ्यावर ग्लो येईल याबद्दल पुढे जाणून घेऊया.

एलोवेरा ज्यूस
एलोवेरा ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. या ज्यूसमुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय एलोवेरा ज्यूस त्वचेला आतमधून हाइड्रेट ठेवण्यास मदत करतो. यामुळे त्वचा मऊ, ग्लोइंग आणि पिग्मेंटेशनच्या समस्येपासून दूर राहते. अशातच दररोज सकाळी 15 मिली एलोवेरा ज्यूस एका ग्लास पाण्यातून प्या.

सब्जा आणि अळीवच्या बिया
सब्जामध्ये फ्लेवोनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. तर अळीवच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात अते. याशिवाय यामध्ये अँटी-एजिंग गुणही असतात. यामुळे हेल्दी त्वचेसाठी एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा दोन्ही बिया मिक्स करुन प्या.

कच्च्या हळदीचे पाणी
कच्च्या हळदीच्या पाण्याच्या सेवनाने शरिराला भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. यामुळे तणावही कमी होते. याचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

अळशीच्या बिया
अळशीच्या बियांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडेंक्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लो होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा बारीक वाटलेल्या अशळीच्या बियांची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करुन प्या.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

शालिनी पासीच्या सुंदर केसांचे सीक्रेट, ट्राय करा हा होममेड शॅम्पू

मुलांची मोबाईल पाहायची सवय कशी मोडावी, पर्याय जाणून घ्या

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Lemon Peel Uses : लिंबाची साल फेकून देताय? थांबा! हे ८ भन्नाट उपयोग नक्की पाहा
Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स