धकाधकीच्या जीवनात घरात शांतता टिकवण्यासाठी धार्मिक उपाय महत्त्वाचे आहेत. गृहशांती पूजा, सत्यनारायण पूजा, महामृत्युंजय मंत्र जप, रुद्राभिषेक, हनुमान चालीसा पठण अशा पूजांमुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक कुटुंबांमध्ये तणाव आणि अशांतता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी धार्मिक उपाय महत्त्वाचे ठरतात. हिंदू धर्मात काही विशिष्ट पूजांद्वारे घरातील नकारात्मकता दूर केली जाऊ शकते.
घरात नियमित पूजा आणि सकारात्मक विचारांमुळे सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहते, असा धार्मिक ग्रंथांमधून उल्लेख आहे.