PM नरेंद्र मोदींच्या सभेवेळी सोन्याने नटलेल्या महिलेची चर्चा, नक्की आहे तरी कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाडमेर सभेवेळी एका ग्रामीण महिलेची जोरदार चर्चा झाली. या महिलेने डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याचे दागिने घातले होते. नक्की महिला आहे तरी कोण जाणून घेऊया.....
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) राजस्थानमधील बारमेर(Barmer) येथील सभेवेळी एका महिलेली जोरदार चर्चा करण्यात आली. या महिलेने सभेचे सूत्रसंचालन केले होते. ममता बिश्नोई असे महिलेचे नाव आहे.
26
ममताचे पंतप्रधानांनी केले कौतुक
ममता बिश्नोईचे (Mamta Bishnoi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारमेर येथील सभेवेळी कौतुक करत तिचे आभार मानले. याशिवाय पंतप्रधानांनी ममताच्या सूत्रसंचलानाचे कौतुक केले.
36
पारंपारिक वस्रामुळे चर्चेत
ममताचे पंतप्रधानांनी कौतुक केल्यानंतर दोन मिनिटे टाळ्याच वाजत राहिल्या. याशिवाय नागरिकांनी ममताच्या पारंपारिक वस्राचेही कौतुक केले.
46
कोण आहे ममता बिश्नोई?
ममता सध्या पंचायत समिती सिवानाची सदस्य आहे. तिच्यावर सभेवेळी सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
56
भाजपची धुरा पुढे नेतेय ममता
ममता दीर्घकाळापासून भाजपसोबत आहे. पंचायत समितीची सदस्य होण्याआधी ती भाजपच्या विद्यार्थी संघटनेतील एबीवीपीमध्ये काही पदांवर कार्यरत होती.
66
अब की बार 400 पारच्या घोषणा
ममता बिश्नोईने अनेकदा मोदी सरकारसाठी अबकी बार 400 पारच्या घोषणा दिल्या आहेत. यासाठी तिला मोठा पाठिंबाही मिळाला.