Lok Sabha Election : राजस्थानमधील या चार महिला उमेदवारांवर असणार नजर, पराभव होऊनही पक्षाने दिलेय तिकीट

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अशातच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. याशिवाय राजकीय पक्षांनी आपल्या उमेदावारांची यादीही जारी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधील चार महिला उमेदवारांवर नजर असणार आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 26, 2024 4:50 AM IST / Updated: Mar 26 2024, 10:22 AM IST

14
संगीता बेनीवाल

संगीता बेनीवाल यांना पाली येथून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी संगीता दोनवेळा राज्य बाल अधिकार संरक्षणाच्या अधिकाऱ्या होत्या. सध्या बेनीवाल सातत्याने पक्षाशी जोडलेल्या होत्या.

24
उर्मिला जैन

उर्मिला जैन भाया यांच्यावरही निवडणुकीसाठी लक्ष असणार आहे. उर्मिला जैन या प्रमोद जान भाया यांच्या पत्नी आहेत. प्रमोद आधीच्या सरकारमधील मंत्री होते. वर्ष 2009 मध्ये उर्मिला यांनी दुष्यंत सिंह विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी खासदारकीची निवडणूक हरल्या होत्या.

34
संजना जाटव

भरतपुर जागेवरून काँग्रेसने संजना जाटव यांना उमेदवारी दिली आहे. संजना यांचे वय केवळ 25 वर्ष आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत संजना जाटव यांना कठूमर यांना तिकीट देण्यात आले होते. पण निवडणूकीत संजना यांचा पराभव झाला.

44
ज्योति मिर्धा

ज्योति मिर्धा नागौर येथील माजी खासदार आहेत. वर्ष 2019 मध्ये ज्योति यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. पण बेनीवाल यांच्या समोर ज्योति यांना पराभव स्विकारावा लागला होता. याशिवाय वर्ष 2023 मध्ये ज्योति मिर्धा यांनी भाजपात एण्ट्री करत विधानसभा निवडणूक लढवली. पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

आणखी वाचा : 

Loksabha Elections 2024 : राजस्थानमध्ये काँग्रेसचे उमेदवार ठरले, पण 'या' एका जागेवरील तिढा अजूनही बाकी

Lok Sabha Election 2024 : बंडखोर आमदारांना भाजपने लोकसभा निवडणुकीत केले बाजूला, जाणून घ्या उमेदावरांच्या पाचव्या यादीतील बड्या गोष्टींबद्दल सविस्तर...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर निघणार महा रॅली, आपच्या वतीने केले जाणार आयोजन

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos