Exclusive : रामललांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, श्री राम मंदिरातील सुंदर सजावटीचे पाहा खास PHOTOS

Ram Mandir Ayodhya : रामलला यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील श्री राम मंदिर सज्ज झाले आहे. मंदिरामध्ये सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीचे पाहा काही Exclusive फोटो

Harshada Shirsekar | Published : Jan 21, 2024 3:40 PM IST / Updated: Jan 21 2024, 09:27 PM IST
112

अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा सोमवारी (22 जानेवारी 2024) पार पडणार आहे. रामलला यांचे दर्शन करण्यासाठी रामभक्त आतुर झाले आहेत. 

212

रामलला यांच्या मूर्तीची सोमवारी शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 

312

अयोध्येतील श्री राम मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.

412

मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भाविकांनी पूर्व दिशेकडील 32 पायऱ्या चढव्या लागतील. येथे सिंहद्वारातून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल.

512

अयोध्येतील श्री राम मंदिराचा पाया उभारण्यासाठी एकूण 2 हजार 587 ठिकाणांच्या मातीचा वापर करण्यात आला आहे.

612

राम मंदिरामध्ये नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप अशा एकूण पाच मंडपांचा समावेश आहे.

712

श्री राम मंदिराची उभारणी पारंपरिक नागर शैलीमध्ये करण्यात आली आहे. मंदिर उभारताना लोखंड-सिमेंटचा वापर केलेला नाही.

812

राम मंदिरामध्ये एकूण 392 स्तंभ आणि 46 दरवाजे आहेत. यावर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.

912

मंदिरातील गर्भगृहामध्ये सुवर्णद्वार बसवण्यात आले आहेत.

1012

रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री राम मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आली आहे.

1112

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देश-परदेशातील पाहुणे मंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत. 

1212
Read more Photos on
Share this Photo Gallery