Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पाहा सोहळ्यापूर्वीचे हे Exclusive व खास फोटो…
Harshada Shirsekar | Published : Jan 19, 2024 3:10 PM / Updated: Jan 19 2024, 03:35 PM IST
अयोध्येमध्ये श्री राम मंदिरात 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 16 जानेवारीपासून अयोध्येमध्ये विशेष अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. 22 जानेवारीपर्यंत विविध पूजाविधी केल्या जाणार आहेत.
विधिवत पद्धतीने, मंत्रोच्चारांच्या गजरामध्ये श्री राम मंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी (18 जानेवारी) रामलला यांची मूर्ती त्यांच्या आसनावर ठेवण्यात आली आहे.
सर्व विधी-परंपरांचे पालन करून शुभ मुहूर्तावर 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशपरदेशातील पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत. देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 19 जानेवारीला धान्याधिवास विधी, 20 जानेवारीला शर्कराधिवास, फलाधिवास विधी, पुष्पाधिवास, 21 जानेवारी मध्याधिवास व शय्याधिवास या विधी पार पाडल्या जाणार आहेत.
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत.
श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरिकांना 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.