Veerabhadra Temple : पंतप्रधान मोदींनी वीरभद्र मंदिरात केली पूजा, राम भजनही गायले PHOTOS
Veerabhadra Temple Lepakshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी गावामधील वीरभद्र मंदिराचे दर्शन घेतले आणि येथे मनोभावे पूजा देखील केली.
Harshada Shirsekar | Published : Jan 16, 2024 7:57 PM / Updated: Jan 16 2024, 09:49 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी (16 जानेवारी 2024) आंध्र प्रदेशातील लेपाक्षी गावामधील वीरभद्र मंदिराचे (Veerabhadra Temple Lepakshi) दर्शन घेतले.
हिंदू महाकाव्य रामायणानुसार लेपाक्षी हे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात की लेपाक्षी येथे प्रभू श्री राम यांनी जटायु यांना मोक्ष प्रदान केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वीरभद्र मंदिरामध्ये (Veerabhadra Temple Lepakshi) राम भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस त्यांनी 'श्री राम-जय राम' हे भजन देखील गायले.
तसेच या मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी तेलुगू भाषेतील रंगनाथ रामायणम् देखील ऐकले.
वीरभद्र मंदिरापूर्वी (Veerabhadra Temple Lepakshi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी 204) नाशिकमधील श्री काळाराम मंदिराचेही दर्शन घेतले होते. या मंदिरातही त्यांनी मनोभावे पूजा केली.
अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत.