राजस्थानमध्ये एक अनोखे घर आहे. या घरातील एक भाऊ हरियाणाचा नगरसेवक तर दुसरा राजस्थानचा नगरसेवक आहे. खरंतर या घराचे दरवाजे दोन राज्यांमध्ये उघडले जातात. नक्की काय आहे ही भानगड याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
Rajasthan : राजस्थानमध्ये एक विचित्र घर आहे. खरंतर हे घर अत्यंत साधे दिसते. पण या घराचा एक दरवाजा राजस्थान आणि दुसरा दरवाजा हरियाणामध्ये (Haryana) उघडला जातो. हैराण करणारी बाब अशी की, या घरातील खोल्या एका राज्यात असून घराचे अंगण दुसऱ्या राज्यात येते.
बहुतांश नागरिक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दूरवरचा प्रवास करतात. अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. पण परिवारातील मंडळी एकाच घरातून दुसऱ्या राज्यात एकमेकांना भेटण्यासाठी जातात हे कधी ऐकलंय का?
एकमेकांना भेटण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातात
राजस्थानमधील अलवर (Alwar) जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या दायमा परिवारातील मंडळी एकमेकांना भेटण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातात. दायमा परिवारातील घराच्या खोल्या हरियाणात असून अंगण हे राजस्थानमध्ये आहे. याशिवाय घराचा दरवाजा हरियाणत असला तरीही घरात वारा हा राजस्थानकडूनच येतो. खरंतर दायमा परिवाराचे घर हे राजस्थानच्या सीमेवर स्थित आहे.
राजस्थान आणि हरियाणात घराच्या खोल्या
घराला एकूण 10 खोल्या आहेत. यापैकी सहा खोल्या राजस्थान आणि चार खोल्या हरियाणात आहेत. हैराण करणारी गोष्ट अशी की, परिवारातील एक सदस्य दोन वेळा हरियाणातील नगरसेवक राहिला आहे. तर दुसरा सदस्य तीन वेळा राजस्थानमधील नगरसेवक राहिला आहे.
एकाच घरातील दोन भाऊ दोन राज्यातील
वर्ष 1960 मध्ये टेकराम दायमा या घरात राहण्यासाठी आले होते. टेकराम यांना कृष्ण आणि ईश्वर अशी दोन मुलं आहेत. संपूर्ण परिवार एकाच ठिकाणी राहात होता. पण राज्यांच्या सीमेमुळे ईश्वरला सर्व कागदपत्र ही राजस्थान राज्याची मिळाली. दुसरा मुलगा कृष्णा याच्याकडे हरियाणातील कागदत्रं आहेत.
आणखी वाचा:
Bharat Rice : पीठ-डाळीनंतर आता भारत राइस येणार, सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ
Success Story : नोकरी सोडून हा तरुण विकतोय गाढविणीचे दूध, व्यवसायामुळे झाला लक्षाधीश
काय सांगता! जेवणात मटण दिले नाही म्हणून नवं वधूच्या घरून वराच वऱ्हाड घरी परतलं