रोहित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची प्रकृती उत्तम असून एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयात असतानाही शरद पवारांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणींबाबत विचारपूस केली. यावेळी कौटुंबिक चर्चा झाली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे रोहित पवारांनी सांगितले.