फडणवीसांपासून हिंडेनबर्गपर्यंत, महाराष्ट्रातील राजकारण ते बॉलिवूडमधील घडामोडी

Published : Aug 10, 2024, 08:24 PM ISTUpdated : Aug 11, 2024, 10:43 AM IST
top 10 news today

सार

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अटकेचे प्रयत्न झाल्याचा दावा केला, तर अजित पवारांनी कांदा निर्यातबंदी चुकीची असल्याचे मान्य केले. दुसरीकडे जरांगेंनी राज ठाकरेंना 'गचांडी धरणार' असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. 

  1. परमबीर सिंह यांचे दावे खरे, मला 4 वेळा अटक करण्याचा प्रयत्न झाला : फडणवीस

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून परमबीर सिंह यांचे दावे खरे असल्याचे म्हटले आहे.

2. देवेंद्र फडणवीसांची RSS नेत्यांसोबत बैठक : विधानसभा निवडणुकीची ठरली रणनीती?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपुरात तीन तासांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे आश्वासन आरएसएसने दिले.

3. गचांडीची भाषा?, राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना खोचक प्रत्युत्तर

मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना 'गचांडी धरणार' असे म्हटले होते. त्यावर राज ठाकरेंनी 'अच्छा… गचांडी? बरं, ते भेटल्यावर मी त्यांना विचारेन' अशी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

4. कांदा निर्यातबंदी चुकीची असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा निर्यातबंदी चुकीची असल्याचे मान्य केले आहे आणि भविष्यात अशी बंदी न घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले.

5. वायनाड दुर्घटनेनंतर PM मोदींचा केरळ दौरा, हवाई सर्वेक्षण करून घेतला आढावा

पंतप्रधान मोदी केरळमधील वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देत आहेत. पंतप्रधानांनी सीएम पिनाराई विजयन यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मृतांची संख्या 413 वर पोहोचली आहे.

6. Wayanad Photos: भूस्खलनाने उद्ध्वस्त गावात पोहोचले PM, सर्वत्र विध्वंसाची दृश्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चुरलमला गावात भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी बचाव कार्यासाठी लष्कराने बांधलेला बेली ब्रिज पायीच पार केला आणि नुकसानग्रस्त शाळेची पाहणी केली.

7. SC ST त कोणताही उपवर्ग नाही, आरक्षण संविधानानुसारच मिळेल; मंत्रिमंडळाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या एससी/एसटी उप-श्रेणीकरणाच्या निर्णयावरून मंत्रिमंडळात चर्चा झाली असून, राज्यघटनेतील आरक्षण नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

8. हिंडेनबर्गचा इशारा: भारतात पुन्हा एका वादळाची चाहूल

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीय बाजारात खळबळ उडवून देण्याचे संकेत दिले आहेत. हिंडेनबर्गने 'भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे' असे म्हटले आहे, पण नेमके काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

9. जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन

Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून विजय कदम कॅन्सरचा लढा देत होते. अखेर 10 ऑगस्टला जेष्ठ अभिनेते यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

10. अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या अफवा सुरु आहेत. दीर्घकाळापासून दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे अंबानींच्या लग्नातही ऐश्वर्या लेकीसोबत आली होती.

 

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!