7 ऑगस्ट2024च्या टॉप 10 न्यूज, मंत्रिमंडळ बैठक १३ निर्णय ते बांग्लादेशात अस्थिरता

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.

1. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत १३ मोठे निर्णय, जाणून घ्या तुमच्यासाठी काय?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकरी, आदिवासी, शिक्षक आणि इतर घटकांसाठी विविध योजनांचा समावेश आहे.

2. 'सगळे चोर फडणवीसांकडेच', मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरात हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यावेळी त्यांनी फडणवीस, भुजबळ आणि आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरले आहे.

3. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ता 17 ऑगस्टला, 3 हजार खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज आले असून, पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या दोन ते अडीच कोटी महिलांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

4. बांगलादेशच्या मुद्द्यावर मोदी का उपस्थित नव्हते? उद्धव ठाकरेंनी मांडला मुद्दा

उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टाकली आहे आणि केंद्र सरकारकडून हिंदूंचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. ते दिल्लीतील आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.

5. कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर, भारताला मोठा धक्का

कुस्तीपटू विनेश फोगट हिचे पॅरिस ऑलिम्पिकमधून वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात येण्याची शक्यताय. 50 किलो गटात स्पर्धा करणाऱ्या विनेशचे वजन दुसऱ्या दिवशी मर्यादेपेक्षा जास्त आढळले. नियमांचे उल्लंघन झाल्याने तिला स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते.

6. वजन अपात्रतेनंतर विनेश फोगटला PM मोदींचे प्रोत्साहन, म्हणाले 'तू चॅम्पियन आहेस'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन जास्त असल्याने विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला प्रोत्साहन देत 'चॅम्पियन' म्हटले आहे.

7. कोण आहे मुहम्मद युनूस? बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे करणार नेतृत्व

बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरता आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलनांमुळे देश सोडून पळून गेल्यानंतरसरकारचे नेतृत्व नोबेल शांति पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना देण्यात आले आहे.

8. बांग्लादेशात हिंसाचाराचा भडका, अवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या; हिंदुंवर हल्ले

बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हिंसाचार उसळला असून अनेक ठिकाणी दंगली पेटल्या आहेत. अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या करण्यात आली असून पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत.

9. Bangladesh Crisis Live: खालिदा झिया यांचा मुलगा लंडनहून मायदेशी का आला?

बांगलादेशात सध्या अस्थिरता आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना देश सोडून भारतात राहत आहेत. ब्रिटनकडून आश्रय मिळालेला नाही, त्यामुळे हसीना भारतातच राहणार आहेत.

10. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची करण्यात आली बदली

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुंबईच्या लोहमार्ग पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची बदली झाली आहे.

 

 

Share this article