चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश

चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सीजेआय यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मतपत्रिकांची तपासणी केल्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

Chanda Mandavkar | Published : Feb 20, 2024 11:40 AM IST / Updated: Feb 20 2024, 05:13 PM IST

Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. कोर्टाने महापौर निवडणुकीवेळी पडलेल्या मतांची पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. सीजेआय (CJI) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मतपत्रिकांच्या तपासणीनंतर म्हटले की, जी आठ मत अवैध घोषित करण्यात आली होती ती आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार (Kuldeep Kumar) यांच्यासाठी पडली होती. अशाप्रकारे चंदीगड येथे आम आदमी पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुप्रीम कोर्टात मंगळवारी (20 फेब्रुवारी) चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी अवैध मानल्या गेलेली मत आम आदमी पक्षाच्या बाजूनेच असल्याचे जाहीर करण्यात आले. याशिवाय कोर्टाने अनिल मसीह यांना मतपत्रिकांवर फुल्ली मारत अवैध का घोषित केले असा सवालही विचारला.

अरविंद केजरीवाल यांचे ट्विट
सुप्रीम कोर्टाने महापौर निवडणुकीसंदर्भातील प्रकरणावर दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “सध्याच्या कठीण काळात लोकशाहीला वाचवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद.”

आम आदमी पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा
सुप्रीम कोर्टाने जुन्या मतांची पुन्हा मोजणी करण्यास सांगिले आहे. याशिवाय आठ अवैध मानल्या गेलेल्या मतांनाही ग्राह्य धरले जाणार आहे. अशातच चंदीगड येथे आम आदमी पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाआधी महापौर म्हणून निवडण्यात आलेले भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला आहे.

आणखी वाचा : 

चंदीगड महापौर निवडणुकीत मतपत्रिकेशी छेडछाड प्रकरण, अनिल मसीह यांच्यावर खटला चालवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने केंद्राच्या पाच वर्षांच्या MSP च्या कराराचा प्रस्ताव नकारला, 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार

UP : परीक्षेच्या दबावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहशतवाद्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे सेवन, उत्तर प्रदेशातील घटना

Share this article