एकनाथ शिंदेंच्या हस्ते चालकांना मराठी प्रमाणपत्र | Auto Taxi Drivers | Marathi Language

एकनाथ शिंदेंच्या हस्ते चालकांना मराठी प्रमाणपत्र | Auto Taxi Drivers | Marathi Language

Published : Aug 27, 2026, 02:03 PM IST

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या आवश्यकतेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरिवली येथे मराठी भाषा प्राविण्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या चालकांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. दैनंदिन संवादासाठी कामचलाऊ मराठी पुरेशी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मराठीमुळे प्रवाशांशी संवाद अधिक चांगला होऊन चालकांच्या व्यवसायालाही फायदा होऊ शकतो, असे ते म्हणाले. महाराष्ट्र ही स्थलांतरित चालकांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वतःच्या रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या दिवसांची आठवण सांगत त्यांनी या व्यवसायाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची आठवणही शिंदे यांनी करून दिली. मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांबाबत प्रत्येक समाजात काही ‘फ्रिंज एलिमेंट्स’ असतात, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मराठी भाषेच्या आवश्यकतेविरोधात चार अॅप-आधारित कॅब चालकांनी राज्य सरकारच्या 12 ऑगस्टच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

05:46रामदास आठवलेंचा रिक्षा परवाना रद्द करण्यास विरोध | Marathi Compulsion | Auto Rickshaw Drivers
05:40Rohit Pawar | रोहित पवारांची MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी | MPSC Paper Leak | FDA Exam
03:32Marathi | टॅक्सी ड्रायव्हरचे बॅच कायमच रद्द , ही मुदत शेवटची Pratap sarnaik
04:01पुण्यात 12 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, जीआर बदलण्याची मागणी | Pune
02:33Marathi | टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती, पण टॅक्सीचा अंत आलाय जवळ | Taxi
03:16Sanjay Nirupam | मराठी शिकण्यासाठी मुदत नको: संजय निरुपम | Auto Taxi Drivers | Tribal Students
03:03Nitin Gadkari | अपघातात नितीन गडकरी यांच्यासह आख्ख कुटुंब वाचलं, गडकरी पुढे म्हणतात
03:07Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule
06:35Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही | Maratha Andolan