अरविंद सावंत: राम मंदिर प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी | RamTemple | SupremeCourt | UCC

अरविंद सावंत: राम मंदिर प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी | RamTemple | SupremeCourt | UCC

Published : Jul 10, 2026, 05:06 PM IST

दिल्लीत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीचे स्वागत करत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली. न्याय मिळण्यास होणारा विलंब हा न्याय नाकारल्यासारखाच असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर आणि अपात्रता प्रकरणांतील विलंबावरही टीका केली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू-मुस्लीम मुद्द्यांऐवजी बेरोजगारी, उद्योग, महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. राम मंदिर देणगी प्रकरणावर आरएसएसच्या बैठकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी (UCC) स्थापन करण्यात आलेल्या समितीबाबत तिच्या शिफारशींची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.