RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार

Published : Apr 17, 2024, 09:03 AM ISTUpdated : Apr 17, 2024, 09:12 AM IST
RBI action on sarvodaya cooperative bank

सार

RBI Action : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकाचवेळी दोन बँकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अशातच तुमचेही खाते या बँकांमध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

RBI Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील सर्व बँकांवर कठोर नजर ठेवली जाते. एखाद्या बँकेने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. याशिवाय काही बँकांकडून आजवर दंडही वसूल करण्यात आला आहे. अशातच आरबीायने दोन बँकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. यापैकी एका बँकेच्या खातेधारकांना खात्यातून केवळ 15 हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेच्या खातेधारकांना 10 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत.

आरबीआयची दोन बँकांच्या विरोधात कारवाई
आरबीआयने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक (Sarvodaya co op bank) आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या (National Urban Co-operative Bank Ltd) विरोधात कारवाई केली आहे. यामुळे नागरिकांना खात्यातून व्यवहार करण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे.

का करण्यात आलीय कारवाई?
आरबीआयने दोन्ही बँकांच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे कारवाई केली आहे. सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना खात्यातून 15 हजार तर नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना केवळ 10 हजार रुपये खात्यातून काढण्यास परवानगी असणार आहे.

खातेधारकांच्या खात्यातील रक्कमेचे काय होणार?
डिपॉझिटर्स डिपॉझिट इंन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या माध्यमातून जमा रक्कमेवर केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट इंन्शुरन्स क्लेमचे हकदार असणार आहेत. दोन्ही बँकांवर बँकिंग रेगुलेशन्स अ‍ॅक्ट, 1949 च्या कलम 35A अंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे 15 एप्रिलपासून दोन्ही बँकांच्या कामकाजासंबंधित काही नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील असेही आरबीआयने म्हटले आहे.

याआधी महाराष्ट्रातील शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी
आरबीआयने राज्यातील शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Shirpur Merchants' Co-operative Bank) बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही पहिलीच वेळ नाही ज्यावेळी आरबीआयने एखाद्या बँकेवर बंदी घातली आहे. याआधीही आरबीआयने पीएमसी बँक आणि येस बँकेतून पैसे काढण्यासाठी काही निर्बंध घातले होते. खरंतर, आरबीआयने शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे घातली आहे.

आणखी वाचा : 

18 दिवसात सोन्याने केले मालामाल, 6 महिन्यात दिला चांगला परतावा

Voter Education : घरबसल्या मतदान कार्डमध्ये असा बदला पत्ता आणि नाव, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा