Ram Mandir Pran Pratishtha : श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान, अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा शुभ मुहूर्तावर संपन्न झाला आहे.  

 

Harshada Shirsekar | Published : Jan 22, 2024 7:07 AM IST / Updated: Jan 22 2024, 02:20 PM IST
18

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान झाले आहेत. अभिजित मुहूर्तावर श्री रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा विधीच्या वेळेस मंदिराच्या गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) हेलिकॉप्टरमधून श्री रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली.

28

रामलला यांचे दर्शन घ्या!

देशातील नागरिकांची 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहामध्ये 84 सेकंदांच्या शुभ मुहुर्तामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

38

शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारांच्या गजरात, धार्मिक विधी, भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर रामलला यांची पहिली झलक समोर आली आहे.

रामललांचे सुंदर डोळे, चेहऱ्यावरील गोड हास्य आणि तेज एकूणच त्यांचे भव्यदिव्य रूप मंत्रमुग्ध करणारे आहे. रामलला यांचे प्रथम दर्शन मिळाल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणत आहे की, कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी अतिशय सुंदर मूर्ती साकारली आहे.

(Ram Mandir EXCLUSIVE : रामललांची मूर्ती साकारणारे अरुण योगीराज म्हणाले- ‘प्रभूंनी मला दर्शन दिले, हा सर्वात मोठा आनंद’)

48

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पहिली आरती देखील केली. आरती संपन्न झाल्यानंतर शंखनाद करण्यात आला. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल यांनीही आरती केली.

58

श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. प्रमुख यजमान म्हणून पंतप्रधान मोदींनी यावेळेस संकल्पासह पूजा केला.  यावेळेस पंतप्रधानांच्या शेजारी सरसंघचालक मोहन भागवत देखील बसले होते. 

68

रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी 12.20 वाजता सुरू झाला आणि दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पूजाविधी संपन्न झाल्या.

मंदिरामध्ये दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “अयोध्या धाममध्ये श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचे अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारे आहेत. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणे हे माझे भाग्य आहे. जय सियाराम!”

78

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पूजेचे साहित्य घेऊन मंदिराच्या गर्भगृहामध्ये दाखल झाले होते. या सोहळ्याच्या पूजाविधीसाठी त्यांनी कुर्ता आणि धोतर असा खास पोशाख परिधान केला होता.

(Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान मोदींचे अयोध्येतील असे आहे वेळापत्रक, 5 तासांत काय करणार? जाणून घ्या)

88

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी VVIP पाहुणे अयोध्येमध्ये दाखल

रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-परदेशातील व्हीव्हीआयपी पाहुणे अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांसह कित्येक सेलिब्रिटी, सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत.

(22 January 2024 Horoscope : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या सविस्तर)

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos