अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जोरदार तयारी सुरू आहेच. पण व्हीव्हीआयपी या सोहळ्याला येणार असल्याने काही खास गोष्टीही केल्या जात आहेत. अशातच सोहळ्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे.
Ram Mandir Ceremony : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देश-विदेशातून काही व्हीव्हीआयपी (VVIP) येणार आहेत. या व्हीव्हीआयपींना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिका अत्यंत खास आहेत.
या पत्रिकांसोबत एक पुस्तकही दिले जातेय. त्यामध्ये राम मंदिराच्या आंदोलनासंबंधित महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावे आणि त्यांच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. येत्या 22 जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.
सात हजार व्हीव्हीआयपींना मिळाले आमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्यदिव्य रूपात पार पडणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमासाठी सात हजारांच्या आसपास व्हीव्हीआयपींना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, व्यावसायिक मुकेश अंबांनी, गौतम अदानी यांच्या नावाचा समावेश आहे.
उद्घाटन सोहळण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना ही खास निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येत आहे. याशिवाय हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाहुण्यांच्या यादीत देशातील साधू-संतांचा देखील समावेश आहे.
निमंत्रण पत्रिकेची खासियत
निमंत्रण पत्रिकेवर श्री राम मंदिराचा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली श्रीराम धामाचा फोटो प्रिंट करण्यात आला असून यावर अयोध्या असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय निमंत्रण पत्रिकेवर उद्घाटसोहळ्यातील कार्यक्रमांचा विशेष कॉलमही छापण्यात आला आहे.
श्री राम मंदिराची पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आनंदी बेन पटेल, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मंदिर ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास उपस्थितीत होते.
आणखी वाचा :
अयोध्येतील राम मंदिरातील खास प्रसाद ही कंपनी तयार करणार
राम मंदिराला सोन्याचे दरवाजे? जाणून घ्या मंदिराबद्दलचे Unknown Facts