
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातीचं नाव 'अहिल्या' ठेवण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणारं हे नाव चर्चेत आलं आहे. सध्या मुलांना ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेली नावं देण्याचा ट्रेन्ड वाढत आहे. सामाजिक, राजकीय, कला आणि मराठी साहित्याची जाण असलेल्या राज ठाकरेंच्या कुटुंबात या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांनीच हे नाव सुचवलं असावं, असा अंदाज व्यक्त होत आहे.