राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? | Mumbai Goa Highway | Konkan | Nitin Gadkari

राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? | Mumbai Goa Highway | Konkan | Nitin Gadkari

Published : Aug 09, 2026, 02:06 PM IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून प्रश्न उपस्थित केले. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले असून माणगाव बायपासचे कामही मोठा अडसर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यावेळी कंत्राटदार कंटाळून पळून गेल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. मात्र कंत्राटदार का पळून गेले आणि स्थानिक राजकीय हस्तक्षेप किती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणातील रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. कोकणातील विकासाला आपला विरोध नसल्याचे सांगत स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्व आमदार एकत्र आले असते तर मुंबई-गोवा महामार्गाला इतकी वर्षे लागली नसती, असेही त्यांनी म्हटले. तसेच कोकणातील स्थानिकांनी जमिनी विकण्याऐवजी उद्योगांमध्ये भागीदार व्हावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. स्थानिक तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या मिळणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप