Postal Ballots च्या आधारे मतदान करण्याच्या नियमात बदल, 85 वर्षांपेक्षा कमी वयातील नागरिकांना घरबसल्या मत देता येणार नाही
केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने जेष्ठ व्यक्तींसाठी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान देण्याची सुविधा दिली आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पोस्ट बॅलेटच्या मतदानाची सुविधा अशाच व्यक्तींचा मिळणार आहे ज्यांचे वय 85 वर्षांपेक्षा अधिक आहे.
Chanda Mandavkar | Published : Mar 4, 2024 4:11 PM / Updated: Mar 04 2024, 04:44 PM IST
पोस्टल बॅलेटच्या मतदानासाठी वयोमर्यादेत बदल
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जेष्ठ नागरिकांना घरबसल्या पोस्टल बॅलेटच्या मदतीने मतदान करणाच्या वयाच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे. यामुळे वयाच्या 85 वर्षांपेक्षा अधिक वयातील नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी वयोमर्यादा 80 वर्ष होती.
केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या चर्चेनंतर घेतला निर्णय
जेष्ठ नागरिकांसाठी पोस्टल बॅलेटच्या मतदानासंदर्भात केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या चर्चेनंतर निर्णय घेतला आहे. यामध्ये 80 वर्षांवरुन 85 वर्षे केल्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत जेष्ठ नागरिकांच्या मतदानाचा पॅटर्न पाहता निर्णय घेतला आहे.
वर्ष 2020 मध्ये पोस्टल बॅलेटच्या मतदानाच्या तरतूदीत बदल
याधीच्या विधानसभा निवडणुकीत असे दिसून आले की, 80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 95 टक्के नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे पसंत केले. अशातच सरकारने वर्ष 2020 मध्ये करण्यात आलेल्या पोस्टल बॅलेट मतदानाच्या तरतूदीत बदल केला आहे.
बहुतांश जेष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊनच केले मतदान
80 वर्षांपेक्षा अधिक वयातील मतदारांपैकी केवळ तीन ते चार टक्के मतदारांनी पोस्टल बॅलेटचा पर्याय निवडला. अन्य जणांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे पसंत केले होते. अशातच केंद्राने पोस्टल बॅलेटच्या मतदानासाठीची वयोगमर्यादा बदलली आहे.
देशात 80-85 वयोगटातील जेष्ठ नागरिकांची संख्या 98 लाख
लोकसभा निवडणुकीसाठी आता फार कमी दिवस राहिले आहेत. देशात 80 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांची संख्या एकूण 1.75 कोटी आहे. यामध्ये 80-85 वयोगटातील नागरिकांची संख्या जवळजवळ 98 लाख आहे.