Income Tax मध्ये सूट मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा
पोस्ट ऑफिसमध्ये बहुतांशजण गुंतवणूक करतात. जेणेकरुन इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल असा विचार केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळत नाही. जाणून घेऊया याबद्दल अधिक....
Chanda Mandavkar | Published : Feb 29, 2024 6:53 AM IST / Updated: Feb 29 2024, 12:28 PM IST
पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये मिळत नाही Income Tax सूट
पोस्ट ऑफिस संबंधित योजनांमध्ये बहुतांशजण गुंतवणूक करतात. यामागील मुख्य कारण म्हणजे, गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. पण पोस्ट ऑफिसच्या पुढील काही योजनांमध्ये तुम्हाला टॅक्समध्ये सूट दिली जात नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खासकरुन महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दोन वर्षांपर्यंत 7.5 टक्क्याने व्याज दिले जाते. पण योजनेत इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची सूट मिळत नाही.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेत एक ते तीन वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत टॅक्समध्ये कोणताही फायदा होणार नाही. पण तीन वर्षांपेक्षा दीर्घकाळासाठी योजनेत गुंतवणूक केल्यास टॅक्सचा फायदा घेता येऊ शकतो आणि 80C अंतर्गत सूटही मिळते.
राष्ट्रीय बचत रिकरिंग डिपॉझिट खाते (NSC)
राष्ट्रीय बचत रिकरिंग डिपॉझिट खाते योजनेत गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळत नाही. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 6.7 टक्के व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळत नाही.
किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.5 टक्क्यांनी व्याज मिळते. पण योजनेत तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत फायदा घेता येत नाही.