Highway : ‘या’ महामार्गामुळे कमी होणार दिल्ली-मुंबईसह अनेक राज्यांमधील अंतर, घ्या अधिक जाणून
1300 किलोमीटरच्या महामार्गामुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे. यामुळे लवकर प्रवास आटोपणे शक्य होणार आहे.
vivek panmand | Published : Feb 28, 2024 1:07 PM / Updated: Feb 28 2024, 01:36 PM IST
अनेक राज्यांमधील अंतर महामार्गामुळे होणार कमी
1300 किलोमीटरचा महामार्ग दिल्ली-मुंबईसह अनेक राज्यांचे अंतर कमी करणार आहे. या मार्गाने प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
गुजरातला जाण्यासाठीचे 200 किलोमीटर अंतर होईल कमी
आपण राजस्थानवरून गुजरातला जात असाल तर या महामार्गामुळे 200 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. मागील 10 वर्षांमध्ये देशात अनेक महामार्ग बनवण्यात आले आहेत.
2 वर्षात महामार्गाचे काम होणार पूर्ण
दिल्ली-मुंबई महामार्ग हरियाणाला गुजरात राज्यात जोडतो. या महामार्गावरून काही ठिकाणी येऊन जाऊन करायलाही सुरुवात झाली आहे. जे काम उरलेले आहे ते 2 वर्षात पूर्ण होणार आहे.
ट्रेन पेक्षा कमी वेळ लागणार
या महामार्गाची खासियत म्हणजे या मार्गावरून प्रवास करताना ट्रेनपेक्षा आपल्याला कमी वेळ लागणार आहे. या महामार्गावरून दिल्ली ते सुरत हे अंतर 8000 किलोमीटर अंतर आहे.
जास्त अंतराचे आहेत दुसरे मार्ग
आपण दुसऱ्या मार्गाने सुरतला जाणार असाल तर आपल्याला 1150 किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तसेच ट्रेनने प्रवास केला तर 1121 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते.
सर्व सुविधांयुक्त महामार्ग
या महामार्गाला सर्व सुविधांयुक्त बनवण्यात आले आहे. यावर चार्जिंग स्टेशन, पेट्रोल पंपसह इतर अनेक सुविधा मिळतील. यामुळे आपला प्रवास आनंददायी होऊ शकतो.
अनेक राज्यांना 'हा' महामार्ग जोडणार
हा महामार्ग गुजरातपासून हरियाणापर्यंत अनेक राज्यांना जोडणार आहे. या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यांमधील लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे.