PM Surya Ghar Muft Bijli Yojana : पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर लावण्यात येणार सोलर पॅनल्स, 300 यूनिट वीज मोफत मिळणार

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रिन्यूएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक कोटी घरांवर सोलर पॅनल्स लावण्यासाठीच्या सब्सिडीच्या मदतीला मंजूरी दिली आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 29, 2024 11:51 AM IST / Updated: Feb 29 2024, 05:39 PM IST

PM Surya Ghar Muft Bijli Yojana : देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल्स (Solar Panel) लावण्यासह प्रत्येक महिन्याला 300 यूनिट मोफत वीज देण्याच्या निर्णयाला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी म्हटले की, रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल्स लावण्यासाठीच्या सब्सिडीसाठी मंजूरी दिली आहे. या घरांवर सोलर पॅनल्स लावल्यानंतर 300 युनिट मोफत वीज प्रत्येक महिन्याला दिली जाणार आहे. सोलर पॅनल्स लावल्यानंतर सरकार 78 हजार रुपयांची मदत करणार आहे.

योजनेसाठी 75021 कोटी रुपयांचा खर्च
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती दिली. ठाकूर यांनी म्हटले की, केंद्रीय कॅबिनेटने पंतप्रधान सूर्यघर योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेवर 75021 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

गेल्या वर्षात 13 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर योजनेची सुरूवात केली आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, या योजनेअंतर्गत केवळ परिवारांना नव्हेच तर सौर उर्जेलाही प्रोत्साहन मिळण्यासह सौर उर्जेपासून वीज तयार करण्यासाठी मदत मिळणार आहे. यामुळे 17 लाख नागरिकांना रोजगार मिळणार आहे.

आणखी वाचा : 

Watch Video: तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहांला अटक केल्यानंतर संदेशखळीतील नागरिकांनी व्यक्त केला आनंद

Breaking : 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाने सुनावला निर्णय

Income Tax मध्ये सूट मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा

Share this article