PM Narendra Modi Schedule : नरेंद्र मोदी जयपुर ते दिल्लीदरम्यान या कार्यक्रमांना लावणार उपस्थिती, जाणून घ्या पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल सविस्तर

Published : Jan 25, 2024, 06:09 PM ISTUpdated : Jan 25, 2024, 06:13 PM IST
PM Narendra Modi

सार

जयपुरात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत रोड शो केल्यानंतर गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतणार आहेत. या दरम्यान, पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपस्थिती लावणार आहेत.

PM Narendra Modi Schedule : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (25 जानेवारी) जयपुरात (Jaipur) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France PM Emmanuel Macron) यांच्यासोबत जंगी रोड शो करणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती देखील लावल्यानंतर रात्री उशिरा ते दिल्लीत परतणार आहेत.

लोकशाही मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचे नमो नवमतदार संमलेन
भारतातील निवडणूक आयोगाने नेहमीच मतदारांकडून मतदानाप्रति असलेल्या उदासीनतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी देखील निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात. 25 जानेवारीला प्रत्येक वर्षी 'मतदार दिवस' (Voters Day) साजरा केला जातो.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मतदारांना लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी संबोधित केले. याशिवाय तरुणांना अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी नमो नवमतदार संमेलनात केले.

भाजप पक्षाचा जाहीरनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना संबोधित करत पुढे म्हटले की, "भाजपचा जाहीरनामा तयार करण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यासाठी आपल्या सूचना द्याव्यात."

सोलार पॉलिसी बैठक
नियमित बैठका आणि नमो नवमतदार संमलेनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलर बैठकीसाठी पोहोचले. या बैठकीनंतर पंतप्रधान उत्तर प्रदेशातील बुलंदशहरकडे (Bulandshahr) जाण्यास निघाले. येथे आल्यानंतर पंतप्रधानांनी एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. यानंतर पुन्हा दिल्लीच्या दिशेने निघाले.

पंतप्रधानांचा दिल्ली ते जयपुर प्रवास
रस्ते मार्गाने दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून राजस्थानला गेले. जयपुर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. येथून पंतप्रधान हवा महाल आणि जंतर मंतर येथे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जाणार आहेत. या ठिकाणी रोड शो देखील होणार आहे. रोड शो नंतर रात्री उशिरा पुन्हा पंतप्रधान दिल्लीत परतणार आहेत.

आणखी वाचा : 

Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपुरात जंगी स्वागत, असा असणार दौरा

Lok Sabha Elections : इंडिया आघाडीला दुसरा झटका, ममता बॅनर्जींनंतर AAP पक्षाची पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!