PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पाय अडखळला, तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना कसे सांभाळले? या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेस तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यादरम्यान ते पंतप्रधान मोदींसोबत चालत-चालत संवाद साधत असताना, अचानक त्यांचा पाय अडखळला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी हात धरून त्यांना खाली पडण्यापासून सावरले. पंतप्रधान मोदी आणि एम.के. स्टॅलिन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
“पंतप्रधान मोदी आपल्यासोबत चालणाऱ्या लोकांची किती काळजी घेतात, हे या व्हिडीओवरून दिसत आहे”, असे सोशल मीडियावरील युजर्स म्हणताहेत. पंतप्रधानांचा हा व्हिडीओ पाहून लोक त्यांचे खूप कौतुक करत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कबड्डी खेळत असल्याचे दिसत आहेत. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री जोशी कर्नाटकामध्ये पोहोचले होते. यावेळेस ते स्वतःला कबड्डी खेळण्यापासून रोखू शकले नाहीत.
कबड्डी खेळतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी म्हणताहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वयात इतके फिट आहेत, हे पाहून त्यांचे मंत्रीही फिट झाले आहेत. यापूर्वी क्रीडामंत्री अनुराग पटेल यांचा फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधील मंदिरांचे करणार दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (20 जानेवारी) तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, यावेळेस ते येथील प्रसिद्ध मंदिरांमध्ये पूजा-प्रार्थना करतील. 22 जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी देशभरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घेऊन तेथे पूजा-प्रार्थना करत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथील श्री काळाराम मंदिर, आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध वीरभद्र मंदिर व केरळमधील दोन प्रसिद्ध मंदिरांचेही दर्शन घेतले.
आणखी वाचा
VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध