पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेआधी पूर्ण करणार आहेत. या विशेष अनुष्ठानावेळी पंतप्रधान काही खास गोष्टींचे पालन करत आहेत.
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपले विशेष अनुष्ठान पूर्ण करणार आहेत. या अनुष्ठानावेळी पंतप्रधान काही नियमांचे सक्तीने पालन करत आहेत. याशिवाय प्रभू श्रीरामांच्या भक्तांना एकजुट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान सध्या देशातील मंदिरांना भेट देत आहेत.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधानांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे अभियान सुरू केले आहे. या स्वच्छता अभियानाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंदिरांच्या स्वच्छतेसाठी सामान्य नागरिक ते कलाकारही पुढे येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अनुष्ठान
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करण्याचा संकल्प केला होता. अनुष्ठानासाठी पवित्र धर्म ग्रंथांमध्ये सांगितलेल्या प्रथांचे पालन पंतप्रधानांकडून केले जात आहे.
अनुष्ठानदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर ब्लँकेट अंथरुण झोपण्यासह केवळ नारळ पाण्याचे सेवन करत आहेत. याशिवाय दररोज गाईंना चारा देणे, त्यांची पूजा करणे अशी कार्येही पंतप्रधानांकडून केली जात आहेत. वस्रदान, अन्नदानही नरेंद्र मोदींकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधील (Nashik) रामकुंड आणि काळाराम मंदिराला (Kalaram Temple) भेट दिली होती. याशिवाय आंध्र प्रदेशातील लेपाक्षी, पुट्टपर्थी आणि वीरभद्र मंदिरासह केरळातील गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात जाऊनही पंतप्रधानांनी दर्शन घेतले होते. आता पुढील दोन दिवस तमिळनाडूतील मंदिरांना भेट देणार आहे.
पंतप्रधानांकडून मंदिर स्वच्छता अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छता अभियानाची सुरुवात नाशिकमधील काळाराम मंदिरापासून केली. या मंदिराचा परिसर पंतप्रधानांनी स्वत: स्वच्छ केला. यानंतर देशभरातील वेगवेगळ्या मंदिरांसाठी स्थानिक सरकारकडून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानात मोठ्या उत्साहाने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या मंदिरांच्या स्वच्छता अभियानासंदर्भात सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'x'वर #SwachhTeerthCampaignचा हॅशटॅग वापरुन युजर्सकडून फोटो-व्हिडीओ शेअर केले जात आहेत.
आणखी वाचा :
Weather Update : 22 जानेवारीला अयोध्येतील हवामानाचा IMDने वर्तवला अंदाज, जाणून घ्या सविस्तर
20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल