रिलायन्स कंपनीचा IPO आणणार मुकेश अंबानी, भविष्यात पुढे जाऊन असा आहे प्लॅन की...

Published : May 28, 2024, 01:55 PM IST
Mukesh Ambani

सार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे त्यांच्या कंपनीचा आयपीओ आणणार असून याबाबतची चर्चा अजून प्राथमिक टप्यावर असल्याची माहिती समजली आहे. या IPO मधील शेअरची किंमत १,२०० रुपये असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लिस्ट होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स ग्रुपचे टॉप एक्झिक्युटिव्ह असून त्यासाठीची चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे. IPO साठी म्हणजेच प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी, शेअरची किंमत रु. १२०० असू शकते.

2020 मध्ये या कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओमध्ये २० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत, ऑफर फॉर सेल (OFC) चा IPO मध्ये मोठा वाटा असेल.

कोणत्या कंपनीकडे किती स्टेक आहे ते जाणून घ्या -
२०२० मध्ये, अंबानींनी जिओ प्लॅटफॉर्ममधील सुमारे ३३% हिस्सा १३ परदेशी कंपन्यांना विकला. यामध्ये मार्क झुकरबर्गचा मेटा ९.९% आणि गुगलचा ७.७३% स्टेक आहे. ही हिस्सेदारी ५७ ते ६४ अब्ज डॉलर्सला विकली गेली आहे. 

रिलायन्सच्या निव्वळ नफ्यात जिओचा २९% वाटा -
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, रिलायन्स जिओचा एकूण महसूल १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, ज्यापैकी निव्वळ नफा २०,६०७ कोटी रुपये होता. रिलायन्सच्या एकूण महसुलात त्याचा वाटा १०% होता आणि निव्वळ नफ्यात योगदान २९% होते.

मोबाईलच्या दरात वाढ होऊ शकते 
रिलायन्स जिओचे मूल्यांकन ८२ ते ९४ अब्ज डॉलर्स असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मोबाईलच्या दरात वाढ झाल्याने ही रक्कम वाढणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईलच्या दरात २५% पर्यंत वाढ होऊ शकते. मात्र, कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
आणखी वाचा - 
व्हॉट्सॲप ग्रुपवरून करण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भावांचे २ कोटींचे नुकसान, त्या वेळी करून बसले चूक आणि...
पुणे शहरात रात्री झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ट्रकचालकाला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात केली तपासणी

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Survival At Sea: १३ महिने ते ४८४ दिवस; समुद्रात हरवलेल्या माणसांच्या जगण्याची थरारक कहाणी!
Delhi School Incident: दिल्लीतील शाळेत ९ वर्षांच्या चिमुकलीचा वर्गातच मृत्यू, थरार CCTV त कैद