दिल्ली मेट्रोला आग लागल्याची घटना २७ मेच्या संध्याकाळी घडली असून यामुळे प्रवाशी खरंच सुरक्षित आहेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. पेंटाग्राफमुळे मेट्रोच्या डब्याला आग लागली असून ही घटना घडल्यानंतर त्या पार्टला काढून टाकण्यात आले आहे.
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये मेट्रोच्या वर आग लागलेली दिसून आली आहे. मेट्रोच्या भागातून कमी आग लागलेली दिसून येत असून ही घटना २७ मेच्या संध्याकाळी घडलेली दिसून आली आहे. वैशालीकडे जाणाऱ्या राजीव चौक स्थानकावरील ट्रेनशी संदर्भात सदर घटना घडून गेल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे मेट्रो स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती.
नेमकं काय घडले -
राजीव चौक स्थानकावरील मेट्रोच्या स्थानकावर प्रवाशी उभे राहिलेले व्हिडिओमध्ये दिसून येते. सर्वांच्या हातात कॅमेरे असून मेट्रोच्या वरच्या भागात लागलेल्या आगीचे चित्रीकरण करण्यात सर्व जण व्यस्थ असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. मेट्रोच्या वर लागलेली आग धोकादायक नसली तरी यासंदर्भातील चौकशी केली जाणार आहे. ट्रेनमधील पेंटाग्राफमुळे आग लागली होती असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
सर्व प्रवाशी सुरक्षित -
प्रवाशी स्टेशनवर असताना सदर घटना घडली. यावेळी ट्रेनमध्ये असणारे सर्व प्रवाशी हे आधीच पेंटाग्राफ काढल्यामुळे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे मात्र मेट्रोच्याबाबत लोकांची असणारी विश्वासार्हता कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. येथे ५ मिनिटांची मेट्रोची तपासणी झाल्यानंतर ती पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून रेल्वे प्रशासन कोणती खबरदारी घेते ते पाहावं लागणार आहे.
आणखी वाचा -
ममता बॅनर्जींनी धार्मिक ग्रंथांविरोधात केली टिप्पणी? भाजप म्हणाले, मुख्यमंत्र्यांना धार्मिक ग्रंथ रद्द करण्याची इच्छा कशी झाली ?
बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या सभेत स्टेज खचला, मिसा भारती यांनी हात देत सावरले; पाहा व्हिडिओ