मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, लेकाच्या लग्नसोहळ्यासाठी या गाण्यावर थिरकणार (Watch Video)

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सोशल मीडियावर रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही प्यार हुआ इकरार हुआ गाण्यावर डान्स प्रॅक्टिस करताना दिसून येत आहेत.

Mukesh Ambani and Nita Ambani Video :  अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग पार्टीला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण अंबानी परिवार आणि मर्चेंट परिवाराने 1 मार्चला झालेल्या संगीत सोहळ्यात धमाकेदार एण्ट्री केली. याच्या काही तास आधी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा रोमँटिंक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, हा व्हिडीओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीच्या संगीत सोहळ्यासाठी डान्स प्रॅक्टिसदरम्यानचा आहे.

अंबानी परिवाराच्या एका फॅन पेजवर नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा लेकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी डान्स प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. गाणे राज कपूर यांच्या ‘श्री 420’ सिनेमातील आहे.

आणखी वाचा : 

अनंत अंबानीचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागले 20 वर्ष, खास आहे किस्सा

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला पॉप सिंगर रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स, जिंकली भारतीयांची मनं (Watch Video)

विराट-अनुष्काच्या मुलाला UK चे नागरिकत्व मिळणार? वाचा काय आहे नियम

Share this article