Marathi

Business News

अनंत अंबानीचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागले 20 वर्ष, खास आहे किस्सा

Marathi

लग्नाआधी अनंत अंबानींनी पूर्ण केला ड्रीम प्रोजेक्ट

अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चेंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचे प्री-वेडिंग 1-3 मार्चदरम्यान जामनगर येथे होणार आहे. याआधी अनंत यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.

Image credits: Social media
Marathi

स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागला 20 वर्षांचा कालावधी

फार कमी जणांना माहितेय की, अनंत अंबानींनी बालपणी एक स्वप्न पाहिले होते जे पूर्ण करण्यासाठी त्यांना 20 वर्षांचा कालावधी लागला आहे.

Image credits: Social media
Marathi

अनंत अंबानी आहे पशूप्रेमी

अनंत अंबानी एकदा जयपुर येथील रणथंबोरला जात होते. वाटेवर अनंत यांनी कडक उन्हात एक माहूत हत्तीसोबत असल्याचे पाहिले. यावेळी अनंत यांच्या मनात पशूंबद्दल प्रेम आणि सेवाभाव निर्माण झाला.

Image credits: Social media
Marathi

जगातील सर्वाधिक मोठे रेस्क्यू सेंटर उभारले

अनंत अंबानींनी भगवद्गीतामधील एक श्लोक आठवून म्हटले की, देव म्हणतो मी प्रत्येक जीवामध्ये आहे. यामुळेच अनंत अंबानींनी जगातील सर्वाधिक मोठे रेक्स्यू सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Image credits: Social media
Marathi

वयाच्या 28 व्या वर्षी पूर्ण झाले स्वप्न

अनंत अंबानींचे स्वप्न आता वयाच्या 28 व्या वर्षी पूर्ण झाले आहे. लग्नाआधी अनंत यांनी 'वनतारा प्रोजेक्ट' लाँच केला आहे.

Image credits: Social media
Marathi

हत्तींसाठी जेवण बनवले जाणार

‘वनतारा प्रोजेक्ट’ अंतर्गत जगभरातील पशूंना उत्तम उपचारच नव्हे हत्तींसाठी किचनमध्ये जेवणही तयार केले जाणार आहे. याशिवाय हत्तींना आंघोळ करण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Image credits: Social media
Marathi

'वनताराचा' अर्थ काय?

‘वनताराचा’ अर्थ असा होतो की, ‘जंगलचा तारा’. अनंत अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मगर, गेंडा, वाघ, अस्वलसारख्या प्राण्यांवरही उत्तम उपचार केले जाणार आहेत.

Image credits: social media
Marathi

पशूंसाठी उभारलेय रुग्णालाय

‘वनतारा प्रोजेक्ट’ अंतर्गत पशूंसाठी एक रुग्णालयही उभारण्यात आले आहे. येथे पशूंवर उपचार केले जाणार आहेत.

Image credits: social media
Marathi

प्राण्यांची काळजी घेण्यासाठी दोन हजारांहून अधिक कर्मचारी

जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या तीन हजार एकर जमिनीवर अनंत अंबानींनी 200 हत्तींची काळजी घेण्यासाठी 500 हून अधिक कर्मचारी नेमलेत. प्रोजेक्टमध्ये एकूण 2100 कर्मचारी काम करणार आहेत.

Image Credits: Social media