MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE

MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE

Published : Sep 13, 2026, 07:02 PM IST

MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचनांची माहिती दिली. परीक्षेची कार्यपद्धती वारंवार बदलण्याऐवजी UPSCप्रमाणे किमान पाच ते आठ वर्षे स्थिर ठेवावी आणि घोषित केलेले परीक्षांचे वेळापत्रक पाळले जावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक संवर्गासाठी किमान किती पदे उपलब्ध असतील हे आधी स्पष्ट करणे, प्रश्नपत्रिकेचा दर्जा सुधारणे, प्रश्नांमधील त्रुटी कमी करणे आणि उत्तरतालिकेत वारंवार होणाऱ्या बदलांवर उपाय करण्याचे मुद्देही बैठकीत मांडण्यात आले. ‘Opting Out’ आणि preference पद्धतीच्या फायदे-तोट्यांचाही समिती अभ्यास करणार आहे. Subjective पेपरच्या तपासणीसाठी केंद्रीकृत व्यवस्था, तपासणी करणाऱ्यांचा दर्जा निश्चित करणे, सर्व परीक्षांसाठी One Time Registration आणि एकदाच शुल्क आकारण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. दिव्यांग आणि क्रीडा कोट्यातील प्रमाणपत्रांची तपासणी, तसेच तक्रारी आणि आक्षेपांसाठी पारदर्शक ऑनलाइन Unified Objection Portal तयार करण्याची गरज मांडण्यात आली. दहा लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्यास परीक्षा केंद्रांवर पाणी, स्वच्छतागृह, योग्य आसनव्यवस्था यांसारख्या किमान सुविधा असणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. पेपर लीकबाबत ‘Zero Leakage’, सखोल चौकशी आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले. यासाठी स्वतंत्र SIT स्थापन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.