Moscow Firing : मॉस्को येथील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख, म्हणाले....

रशियाची राजधानी मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे.

Moscow Firing : मॉस्को येथे शुक्रवारी (22 मार्च) संध्याकाळी एका कॉन्सर्ट हॉलमध्ये तीन ते चार बंदूकधाऱ्यंनी गोळीबार केला. या गोळीबारात 60 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बंदूकधाऱ्यांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट केल्याने इमारतीला आगही लागली गेली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथील दहशतवादी हल्ल्यावर सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी मॉस्कोमधील हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. पीडितांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. या दु:खाच्या काळात भारत रशिया सरकार आणि नागरिकांसोबत एकजुटतेने उभा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
मॉस्कोमधील हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (Islamic State) घेतली आहे. दहशतवादी संघटनेने आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक विधान जारी केले आहे. या विधानात म्हटलेय की, "आमच्या मुलांनी रशियाची राजधानी मॉस्को येथील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला केला आहे. याशिवाय हल्ल्यानंतर दहशतवादी आपल्या ठिकाणी परतले आहेत."

दहशतवाद्यांचे फोटो आले समोर
रशियाच्या मीडियाने दहशतवाद्यांचे फोटो जारी केले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानुसार म्हटलेय हल्लेखोर आशियाई आणि कॉकेशियाई नागरिकांसारखे दिसत होते. याशिवाय हल्लेखोर रशिया नव्हे तर परदेशी भाषेत बातचीत करत होते. रशियाच्या मीडियाने दावा केलाय की, दहशतवादी इंगुशेटियातील (Ingushetia) स्थानिक आहेत. सैन्याच्या वर्दीत आलेल्या दहशतवाद्यांनी हॉलमध्ये घुसून गोळीबार करण्यास सुरूवात केली. या घटनेत मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले आहेत.

आणखी वाचा : 

Moscow Firing : मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 60 जणांचा मृत्यू, दहशतवादी संघटना Islamic State ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

मुलाने आपल्या 72 वर्षांच्या वडिलांसोबत या देशाच्या PM पंगा घेतला, डीपफेकद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण...

अमेरिकेच्या H-1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठी 22 मार्चपर्यंत मूदत, ऑनलाइन अर्जासाठी ही कागदपत्रे सादर करावी लागणार

Share this article