मुंबईतील अंधेरी स्थानकाबाहेर मनसे समर्थकांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.