
मुंबईतील ससून डॉक येथे मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत बॅलेट पेपर असो किंवा ईव्हीएम, निकाल सारखाच लागेल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि टायगर श्रॉफ प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली. तसेच सारा अली खान यांच्या केदारनाथ दर्शनाचे स्वागत केले.